रेल्वेचा एका रुपयात दवाखाना सुरू
PUBLISHED : May 10 , 7:41 PM
रेल्वेचा एका रुपयात दवाखाना सुरू
लोकल रेल्वेमार्गावर वाढणार्या अपघातांची संख्या लक्षात घेऊन रेल्वेने घाटकोपर स्थानकाबाहेर 1रुपयात वैद्यकीय सल्ला पुरवणारे पहिले ‘वनरुपी’ क्लिनिक बुधवारपासून सुरू केले. काही दिवसांपूर्वीच रेल्वेने केलेल्या या घोषणेची पूर्तता करण्यात आली आहे.

मुंबई : लोकल रेल्वेमार्गावर वाढणार्या अपघातांची संख्या लक्षात घेऊन रेल्वेने घाटकोपर स्थानकाबाहेर 1रुपयात वैद्यकीय सल्ला पुरवणारे पहिले ‘वनरुपी’ क्लिनिक बुधवारपासून सुरू केले. काही दिवसांपूर्वीच रेल्वेने केलेल्या या घोषणेची पूर्तता करण्यात आली आहे.
सकाळी 9 वाजता हे क्लिनिक खुले झाल्यानंतर काही काही तासातच 40 ते 45 लोकांनी एका रुपयात येथून वैद्यकीय सल्ला घेतला. सायंकाळपर्यंत हा आकडा 80 च्या पार गेला होता. यामध्ये रक्तदाब तपासणी आणि वैद्यकीय सल्ला घेणार्या रुग्णांची संख्या अधिक होती. रेल्वे अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना या ठिकाणी मोफत प्राथमिक उपचार दिले जाणार आहेत. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सरकारी किंवा पालिका रुग्णालयात हलवले जाईल.
घाटकोपरनंतर दादर, कुर्ला, मुलुंड, ठाणे या रेल्वे स्थानकातही असे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या क्लिनिकच्या बाजूला एक औषधाचे दुकानही काढण्यात आले आहे. यातून मिळणार्या नफ्यातून हे क्लिनिक चालवण्यात येईल, असे या क्लिनिकमध्ये असणारे डॉ. राहुल घुले यांनी सांगितले.